31-07-2020 - 15-08-2020

Project Highlights* == Plantation of Medicinal Plants at home / personal farm == Create healthy environment around == Understand the benefits of the Medicinal Plants, Learn to use them for health benefits The project will be done in multiple phases. The beneficiaries will be given a complimentary kit from the Club. However, we make an appeal to the beneficiaries to give a token donation to the Club for this project. Phase 1 : Flat / Row house Expected Expenses *Rs. 10000* Phase 2 : Small Personal Farms Expected Expenses *Rs. 20000* *Total Project Cost : Rs. 30000* दरवर्षी वृक्षारोपण हा आपल्यासाठी उत्सव असतो.त्यानिमित्ताने आपली एक ट्रीप पण होते.यावेळी कोविड 19 मुळे आपल्याला हा प्रोजेक्ट थोडा वेगळ्या पद्धतीने घ्यावा लागणार आहेत.त्यासाठी आपण एक वेगळा संकल्प केलेला आहे. मित्रांनो आपण यावेळी औषधी वनस्पतींचे जतन, संरक्षण व संवर्धन असा पर्यावरणपूरक विषय हाती घेणार आहोत.तुम्हाला सांगायला हरकत नाही जेव्हा कोविड 19 या महामारीवर औषध उपलब्ध नाही व आपली रोगप्रतिबंधक क्षमता हीच महत्त्वाची आहे ; आयुर्वेदिक औषधे ह्यासाठी उपयुक्त आहेत असे समजल्यावर गुळवेल, अश्वगंधा,तुळस, शतावरी, हया वनस्पती कित्येक टन तोडल्या गेल्या तेव्हढ्या प्रमाणात ह्या वनस्पती उपलब्ध नाहीत लवकरच या वनस्पती दुर्मिळ होतील.अशातर्हेने औषधी वनस्पती तोडल्या व परत लावल्या गेल्या नाहीत तर लवकरच त्या नामशेष होतील.भारतीय संस्कृतीने संपूर्ण जगाला दिलेली देणगी म्हणजे आयुर्वेद आहे.हा आपल्या संस्कृतीचा वारसा आहे. भविष्यात कोविड19पेक्षा सुद्धा भयानक व्हायरस येवू घातले आहेत. त्यामुळे ह्या वनस्पती सहजपणे आपल्याला उपलब्ध व्हाव्यात व आपल्या भारतीय संस्कृतीने दिलेला हा अमोघ ठेवा आपण जतन करावा म्हणून सामाजिक जाणीवेतून आपण औषधी वनस्पतींची ओळख,लागवड,जपणूक करणार आहोत. आयुर्वेदात तर औषधी वनस्पती अगणित आहेत.'नास्ति मूलं अनौषधं'असे एक सूत्र आहे.एकही वनस्पती अशी नाही की ज्याचा औषधी उपयोग होवू शकणार नाही.फक्त 'योजकस्तत्र दुर्लभ:'! त्याची संपूर्ण माहिती असणे व त्याचा उपयोग युक्तीने करुन घेणारा योजक दुर्मिळ आहे. तर यासाठी आपण एक उपक्रम हाती घेत आहोत.यामध्ये तीन पद्धतीने आपण या वनस्पती आपल्या रोटरी मित्रांना लावायला देणार आहोत.वनस्पती लावणे व जतन करणे यासाठी जागा लागते.पण काही वनस्पती अशा आहेत की त्या आपण कुंडीत लावू शकता. कुंडीत वाढणारा हा परसबागेतील दवाखाना सर्दी,खोकला,ताप, अंगदुखी, पोटदुखी,अजीर्ण ,पाय मुरगळणे,केसातील कोंडा,केस गळती थांबविण्यासाठी छान उपयोगी पडेल. त्यासाठी मी वनस्पतींची ओळख ऑडीओ क्लिप द्वारे देणार आहे. या वनस्पती आपणास हव्या असतील तर आपण कृपया नावनोंदणी करणे क्रमप्राप्त आहे.आपल्याकडे ह्या वनस्पती असतील तरी आपण भेट म्हणून आपल्या मित्र मैत्रिणींना , आसपासच्या शेजार्यांना भेट म्हणून द्यावीत.पण बहुसंख्येने नावनोंदणी करावी. परसबागेतील दवाखाना करण्यासाठी तुळस गवती चहा,ओवा, वेखंड,कोरफड,अस्थिसंधानक किंव्हा हाडसंधी, अडुळसा,निर्गुडी, गुळवेल, मायाळू , अश्वगंधा, शतावरी,,ब्राम्ही,माका यापैकी पाच वनस्पती आपण देणार आहोत.तर आपल्या परसबागेत दवाखाना उघडण्यासाठी सज्ज व्हा.फक्त याची नोंदणी करणे आवश्यक आहे.

Project Details

Start Date 31-07-2020
End Date 15-08-2020
Project Cost 30000
Rotary Volunteer Hours 40
No of direct Beneficiaries 50
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Environment Protection