02-04-2021 - 02-04-2021

रोटरी क्लब आॕफ तळेगांव दाभाडेच्या डिजिटल स्कुल मोहीमे अंतर्गत टॕबलेट लायब्ररीची उभारणी व लोकार्पण सोहळा. --- अॕप्टीव्ह कांम्पोनंटस् ( इं ) प्रा. लि. चाकण, रोटरी क्लब आॕफ त.दा. आणि रोटरी पुणे पाषाण यांच्या संयुक्त विद्यमाने अॕप्टीव्ह कंपनीच्या CSR फंडातुन उपलब्ध झालेल्या रु. एक लाख पन्नास हजार फक्त यातुन त.दा.न.प. नथुभाऊ भेगडे प्राथमिक शाळा क्र.१ , तळेगांव दाभाडे येथे डिजीटल स्कुल मोहीमे अंतर्गत, १ ली ते ८ वी साठी टॕबलेट लायब्ररी अनावरण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दि.०२.०४.२०२१ रोजी सकाळी ११ वाजता मा. सौ. चित्राताई जगनाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात संपन्न झाला. प्रसंगी अध्यक्ष रो. राहुल दांडेकर, सचिव रो. अनिश होले मा.आध्यक्ष.व प्रोजेक्ट समन्वयक रो. महेश महाजन, प्रोजेक्ट चेअरमन रो. बाळासाहेब चव्हाण, रो. जयवंत देशपांडे, अतुल हंम्पे, धनंजय मथुरे हे प्रामुख्याने उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात सौ. चित्राताईंनी डिजीटल स्कुल या संकल्पने अंतर्गत रोटरी क्लब तळेगाव दाभाडे चांगले कार्य करीत आहे, टॕबलेट लायब्ररी ह्या अभिनव संकल्फनेला प्रत्यक्षात आणली यासाठी समाधान व्यक्त केले. तसेच या प्रकल्पांचे प्रमुख रो. बाळासाहेब चव्हाण व प्रकल्प समन्वयक रो. महेश महाजन मा. अध्यक्ष व क्लबचे या प्रकल्पासाठी आभिनंदन व कौतुक केले. तसेच अॕप्टीव्ह कंपनीचे आभार मानतानाच तळेगावांतील अशा शाळांना प्राधान्य देऊन येथील गरीब विद्यार्थी-विद्यार्थीनींना भविष्यात शैक्षणीय सुविधा द्याव्यात, व तशी गरजही आहे, अशी इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुरेख आखणी व सुत्रसंचलन मुख्याध्यापिका मा.सौ. सुरेखाताई जाधव व त्यांचे सहकारी यांनी केले. प्रसंगी शिक्षक/शिक्षिका यांनी हा सोहळा यशस्वी व्हावा यासाठी कोरोनाचे भान ठेवुन आयोजन केलें. या लोकार्पण सोहळ्याची सांगता अध्यक्ष रो. राहुल दांडेकर यांच्या उपस्थितांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

Project Details

Start Date 02-04-2021
End Date 02-04-2021
Project Cost 140000
Rotary Volunteer Hours 25
No of direct Beneficiaries 800
Partner Clubs
Non Rotary Partners Aptive Components India Pvt. Ltd.
Project Category Literacy